समाजकार्यासाठी झपाटलेेले व्यक्तिमत्व : वैभव देवरे

आम्ही समाजासाठी, समाज आमच्यासाठी
हे ब्रीद वाक्य घेऊन मी 2011 ला राजकारणात आलो व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडायचे कारण की पवार साहेबांचे एक वाक्य लक्षात होते 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण! म्हणून मी राष्ट्रवादी पक्षात आलो. माझ्याकडे असंख्य युवकांचे संघटन असल्याने मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत असल्यामुळे मी जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांनाही न्याय दिला.

आगीत घर उद्ध्वस्त झालेल्या शिंदे कुटुंबास मदतीचा हात म्हणून धान्य देताना तेजस्वी, चैतन्य व वैभव देवरे.

माझे मावळा सामाजिक प्रतिष्ठान आहे. त्यामार्फत नाशिक शहर व नाशिक जिल्ह्यात सामाजिक कामे करतो. आम्ही कोविडच्या काळात अनेक गरजू, तसेच गरीब लोकांना वेळोवेळी अन्नधान्य, किराणा, तसेच शक्य असेल तेवढी रोख रक्कमदेखील आम्ही प्रतिष्ठानमार्फत दिली, तसेच बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील एक युवक खूपच आजारी पडला. त्याला औषधोपचार घेणे शक्य नव्हते, म्हणून त्या ललित नामक युवकास औषधोपचारासाठी प्रतिष्ठानने 11 हजार 111 रुपये रोख दिलेत व पुढ ील खर्चाचीदेखील जबाबदारी पार पाडली, तसेच मालेगाव तालुक्यातील पोहाने गावातील रवींद्र शिंदे आदिवासी कुटुंंबाचे राहते घर रात्री अचानक जळून खाक झाले, अशी बातमी टीव्हीवर बघितली व दुसर्‍या दिवशी लगेच आम्ही त्या आदिवासी शिंदे कुटुंबाला त्वरित घरातील सर्व सामान घेऊन पोहाने येथे जाऊन दिले व उदरनिर्वाहासाठी 11 हजार 111 रुपये देऊन आगीत खाक झालेल्या कुटुंंबाला आधार दिला, तसेच कोल्हापूर येथील पूरग्रस्तांची परिस्थिती माझी मुलगी सई व मुलगा शाहू यांनी टीव्हीवर बघितली.

मराठा मोर्चासाठी केलेले बाईक रॅलीचे आयोजन.

ते भयानक पुराचे दृश्य बघितल्यावर त्वरित सई व शाहू यांनी त्यांचे पिग्मी बँकेमधले खाऊचे जमा झालेले सर्व पैसे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यामार्फत पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस जमा केले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनीदेखील सई व शाहू या चिमुकल्यांचे भरभरून कौतुक केले व त्यांनी फेसबुक पोस्टदेखील केले, जेणेकरून लोक त्याचा बोध घेतील.

राणेनगर येथे भास्कर नकली हे दिव्यांग दाम्पत्य राहत आहे. ते दिव्यांग दाम्पत्य आपला उदरनिर्वाह खाट विणून चालवीत असे. कोरोनामुळे व्यवसाय बंद होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. राहत्या घराचे लाईट वायरमन यांनी कट केल्याने त्यांच्या घरात अंधार झाला. आम्ही त्वरित ते लाईट बिल भरून त्यांना तीन महिन्यांचा किराणादेखील भरून दिला.

दि. 1 एप्रिल रोजी माझा व माझ्या मुलाचा वाढदिवस असतो तो साजरा न करता त्याचा खर्च कोरोना बाधीत झालेल्या लोकांच्या औषधोपचारासाठी देण्यात आला, असे अनेक मोठेमोठे उपक्रम राबविण्यात आले. मुलगी सईचा वाढदिवस न करता त्या खर्चातून वृद्धाश्रमातील आजी बाबांना पाच महिने पुरेल एवढा किराणा देखील मी घेऊन दिला.

नवीन नाशिकमधून शिवजयंतीला मावळा सामाजिक प्रतिष्ठानमार्फत भव्यदिव्य बाईक व कार रॅलीचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी साईशक्ती व मावळा सामाजिक प्रतिष्ठान मंडळाचा गणेशोत्सव व नवरात्र साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो तसेच पक्षासाठी नवा फॉर्म्युला ‘एक बूथ टेन युथ’ अशा भन्नाट संकल्पना राबविल्यामुळे युवक वर्ग सर्वत्र चर्चेत राहिला, तसेच एक मराठा लाख मराठा या आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नवीन नाशिकमधील 1000 ते 1500 युवक व स्थानिक नागरिक होते. याच समाजोपयोगी कार्याचा वसा पुढे चालविण्यासाठी मी प्रभाग क्रमांक 38 मधून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून उमेदवारी मागत आहे. त्यापाठोपाठ नागरिकांनीही आपल्या हक्काचा नगरसेवक म्हणून आशीर्वाद द्यावा, हक्काचा नगरसेवक म्हणून मी आपल्या सेवेत सदैव हजर राहील मी तुम्हाला शब्द देतो की सर्वांत पहिले मी आपल्या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास कसा होईल याकडे लक्ष देईन. मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चाचे आयोजन देवरे यांनी केले होते.

‘मै झुकुंगा नही, प्रभाग 38 के विकास के लिये रुकुंगा नही…’

वैभव देवरे यांच्या संकल्पना

  • मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका.
  • यूपीएससी व एमपीएससी या परीक्षेसाठी 12 ही महिने मोफत मार्गदर्शन.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी परिचय उद्यान.
  • महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा.
  • स्वामी विवेकानंद पुतळा समोर व आजूबाजूला होर्डिंग लावून स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण माहिती फलक लावू.
  • प्रभागातील जे मोकळे भूखंड आहेत ते त्वरित प्रभागातील नागरिकांच्या उपयोग्गी करून घेऊ.
  • प्रभागातील सर्व नाले बंदिस्त करून त्या नाल्यांवर सुशोभीकरण करून नागरिकांना त्याचा फायदा करून देईल.
  • स्वखर्चाने शववाहिका व रुग्णवाहिका प्रभागासाठी मोफत देण्याचे नियोजन.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!