मुंबई : कंपनीत ठेवींवर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या ठगास रांची येथून अटक करण्यात आली आहे.
गोविंद सिंह असे या ठगाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की वसई-विरार संकुलात राहणाऱ्या हजारो नागरिकांना ईगल लाईट या कंपनीत ठेवींवर जास्त व्याज देण्याचे आमिष कंपनीच्या वतीने दाखविण्यात आले होते. अनेकांनी त्यामध्ये गुंतवणूक केली. नंतर सर्वांची फसवणूक करून तो तेथुन पसार झाला.
फसवणुकीला बळी पडलेल्या लोकांनी आचोलो पोलिसात त्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रेस करून त्याला अटक केली. सिंगने वसई-विरारसह रांची येथे ईगल लाईट कंपनीची शाखा उघडून तो साध्या नागरिकांची फसवणूक करत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांचे आवाहन
गोविंद सिंहने केलेल्या फसवणुकीला आणखी बळी पडला असाल तर, तुम्ही आचोलो पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवावी. त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा मिळू शकेल.