मुंबई :- मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (वय 65) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. प्रदीप पटवर्धन यांचे त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या.
मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती.
त्यांनी कॉलेज काळापासूनच एकांकिका स्पर्धेत काम केले होते. त्यानंतर ते व्यावसायिक नाटकाकडे वळले. मराठी रंगभूमीवरील कलाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी अनेक नाटकात, चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. मोरूची मावशी हे त्यांचे नाटक खूप गाजले. याशिवाय त्यांनी नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते.