मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तीन दिवसांपूर्वी त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी चाहत्यांनीही त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ कोल्हापुर येथे झाला. “आनंद” आणि “ताकदीर” या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. देव यांनी ‘अंधाला मगटो एक डोला’ (१९५६) या चित्रपटातून करमणूक उद्योगात पदार्पण केले. त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट “आरती” होता. त्याशिवाय 2013 मधील 11 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पीआयएफएफ) रमेश देव यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने गौरविण्यात आले.