Video : मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; “इतक्या” किलो सोन्यासह मुद्देमाल जप्त

मुंबई : सोन्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. त्याच दरम्यान सोन्याची तस्करीचे प्रमाण देखील वाढत चाले आहे. अशातच मुंबई विमानतळावर मोठी करावाई करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या दोघांकडे असलेल्या पुस्तकांच्या पानांमध्ये लपवून ठेवलेले ९०,००० युएसडी आणि अंडरगारमेंटमध्ये लपवून ठेवलेले पेस्ट स्वरूपात २.५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी, मुंबई विमानतळावर ३ किलो सोने जप्त करण्यात आले होते. सोन्याच्या तस्करीप्रकरणी ३७ वर्षीय माहिर अलीयेव या अझरबैजानी नागरिकाला अटक करण्यात आली होती.

https://twitter.com/ANI/status/1617721190021488642?s=20&t=0O8k5m_HskQLTlhbMCX4jA

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!