नासिक (राजन जोशी)- नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीने नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार याद्या या गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्या असल्या तरी अखेरीस २४ तासानंतर का होईना या सर्व याद्या ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्यात आल्या आहेत.

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या आदेशाने महापालिकेने नव्याने तयार केलेल्या मतदार याद्या गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. काही तांत्रिक अडचणीमुळे या याद्या वेबसाईटवर अपलोड करण्यात अडचणी येत होत्या. मात्र चोवीस तासानंतर का होईना या याद्या अपलोड करण्यात आले आहेत. या मतदार याद्या आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा बघता येऊन त्याची प्रिंट काढता येणार आहे.

त्याचबरोबर या सर्व याद्या नाशिक महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यासाठीची आवश्यक रक्कम भरून या याद्या विकत घेता येणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी दिली. त्याच बरोबर नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभागांमध्ये किती मतदार आहे याबाबतची सूची सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.