सुवर्णा वाजे खून प्रकरणात संदीप वाजेचा मावसभाऊ पोलिसांच्या ताब्यात

 

नाशिक (प्रतिनिधी) :- वाडीव-हे येथील सुवर्णा वाजे हत्याकांड प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संदीप वाजे याचा साथीदार व मावसभाऊ तसेच जिल्हा परिषदेचा ठेकेदार यशवंत म्हस्केला अटक केली आहे. यशवंत म्हस्के हा संदीप वाजेचा गुरु असल्याचे देखील प्रथमदर्शनी समोर येत आहे. तसेच या प्रकरणामध्ये समृद्धी महामार्गाच्या पैशाच्या संदर्भात देखील काही गोष्टी पुढे येत असल्याने पैशाला अडचण ठरणाऱ्या डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या झाली का? या दृष्टिकोनातूनही आता पोलीस तपास करीत आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले की, वाडीव-हे शिवारात रायगडनगर शिवारात नाशिक ते मुंबई जाणाऱ्या रोड लगत मिलिट्रीचे गेट नंबर ३६ समोरच्या रोडवर एक फोर व्हीलर गाडीला आग लागुन आगीत ती गाडी संपुर्ण जळालेली होती. गाडीच्या आत एका अनोळखी स्त्री जातीचे प्रेत वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे जळुन मयत झाली होती.

याबाबत वाडीव-हे पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आपले सचोटी व कौशल्याने केलेला तपास व फॉरेंसिक तज्ञ यांना देण्यात आलेले रिपोर्ट व त्यावर त्यांनी दिलेले त्यांचे अभिप्राय व तपासा दरम्यान मयताचे नातेवाईक यांचेकडे केलेली चौकशी व त्यांचे नोंदविलेले जबाब या संपूर्ण तपासाच्या अनुषंगाने पथकाने गुन्ह्यातील आरोपी डॉ. सुवर्णा वाजे यांचे पती संदिप महादु वाजेला दिनांक 3 फेब्रुवारी रोजी रोजी अटक केली होती. आरोपी संदिप वाजे याची १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा केले होते. या पुराव्यांच्या आधारे वाजेचा साथीदार बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र म्हस्केला या गुन्ह्यात अटक करण्यात आली. मुख्य आरोपी संदिप वाजे याची कोर्टाने नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के याला आज  न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची पुढील तपासाकरीता ७ दिवस पोलीस कोठडी दिली आहे.

पोलीस अधीक्षक  सचिन पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार वाडीव-हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  अनिल पवार हे पुढील तपास करीत आहे. सदर कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक अनिल पवार, पो. ना. पवार, पोकॉ मराठे, भावनाथ काकड हे सहभागी होते.

दरम्यान दुसरीकडे या सर्व प्रकरणामध्ये समृद्धी महामार्गाचा येणारा पैसा देखील अडसर ठरण्याची भूमिका समोर येत आहे. कारण संदीप वाजेच्या हिस्सातुन सुवर्णा वाजे यांना सुमारे अडीच कोटी रुपयांच्या जवळपास रक्कम मिळणार होती. त्यावर देखील संदीप वाजेचा डोळा होता असे देखील आता समोर येत आहे. त्या दृष्टिकोनातून पोलीस अधिक तपास करीत आहे. बाळासाहेब म्हस्के हा देखील सध्या जामिनावर बाहेर होता. त्याच्या पत्नीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!