कोलकाता :- बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक केके याचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
तो 54 वर्षांचा होता. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदय विकाराच्या झटका आल्याने त्याला CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी काहीही माहिती सांगितलेली नसल्याने केके यांच्या शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण अधिकृतपणे स्पष्ट होणार आहे.