खरी शिवसेना कोणाची? निर्णय पुन्हा “या” तारखेपर्यंत स्थगित

नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :– राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने असून सुप्रिम कोर्टात आज कोणताही निर्णय होऊ शकला नाही. याबाबतची सुनावणी येत्या सोमवारी केली जाणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान इतर मुद्यांवर दोन्ही पक्षांचे युक्तीवाद सुरु आहेत.

सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी सुरु झाला असता पुन्हा एकदा शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी 10 व्या सूचीचा मुद्दा उपस्थित केला. पक्षांतरबंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही असा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नाही असं मत मांडलं. दरम्यान सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करु शकत नाही असं सांगत त्यांना पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका अशी सूचना केली आहे.

सोमवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या वादावर, “आता हा निर्णय विधानसभाध्यक्षांनी घेतला पाहिजे, अशी आग्रही भूमिका का घेतली जात आहे”, असा सवाल उपस्थित करत खडसावले होते. अपात्रतेच्या मुद्दयावरून शिंदे गटाने पहिल्यांदा न्यायालयात धाव घेतली असताना आता मात्र त्यांच्या भूमिकेत झालेल्या बदलावर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!