दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासह प्रभागातील सामान्य नागरिकांच्याही समस्या वेळोवेळी सोडविल्या आहेत.
आगामी काळातही समाजसेवेचा वसा आणि प्रभागाची विकास कामे सुरूच ठेवणार आहोत, अशी माहिती स्वामी विवेकानंदनगर सिडको परिसर प्रभाग 38 चे समाजसेवक बाळासाहेब मारुती घुगे यांनी दिली.
आगामी मनपा निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर होताच निवडणूक लढवू इच्छिणार्या इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. या अनुषंगाने यासंदर्भात माझे कार्य माझी संकल्पना उपक्रमांतर्गत दैनिक भ्रमरशी बोलताना बाळासाहेब घुगे यांनी सांगितले, की ते स्वत: सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यातूनच सध्या वंजारी समाज फाऊंडेशनचे प्रदेशाध्यक्ष, न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष, भाजपचे दिव्यांग विकास आघाडीचे सिडको मंडल अध्यक्ष, अशी पदे भूषवीत आहेत. स्वत: व पत्नी दिव्यांग असून, दिव्यांगांना येणार्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडविण्याचा आजवर प्रयत्न केला आहे, याचेच एक उदाहरण त्यांनी सांगितले, की एका दिव्यांग व्यक्तीचे वीज मीटर महावितरण कंपनीने काढून नेलेले असताना त्याचा वीजपुरवठा पुन्हा चालू करून दिला. भाजपच्या माध्यमातून दिव्यांगांबरोबरच अन्य सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवीत आलो आहे. प्रभागाप्रमाणेच जिल्हा शासकीय रुग्णालयातही येणार्या दिव्यांग बांधवांना वेळोवेळी मदत केली आहे.

भाजप पक्षवाढीसाठी जिल्हाभर वेळोवेळी दौरे व विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला आहे. दिव्यांग संस्थांना मदत, तसेच दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठी संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू उपक्रम व वेळोवेळी इतर उपक्रम साजरे करण्यात आले आहेत.

सामाजिक कार्याचा आणखी एक भाग म्हणजे अनेक गरजू नागरिकांना, निराधारांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला. महापालिकेच्या 2000 रुपये पेन्शन योजनेचा नवीन नाशिक परिसरातील 500 हून अधिक दिव्यांगांना लाभ मिळवून दिला. गरजू दिव्यांगांना तीनचाकी सायकली, कुबड्या, कॅलिपर, अंध व्यक्तींना पांढरी काठी, गरजूंना मोफत चष्मेवाटप वेळोवेळी करण्यात आले. नुकतेच जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यापुढेही दिव्यांग बांधवांबरोबरच समाजातील सर्वच घटकांचा आणि प्रभागातील सर्व विभागांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहेच. माझी जनसेवा निरंतर सुरूच राहील. त्याला अधिक बळ आणि व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रभाग 38 मधील मतदारांनी नगरसेवक म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी, अशी विनंती बाळासाहेब मारुती घुगे यांनी केली आहे. मी निवडून आल्या आल्या सिडको मधील दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रभागातल्या गरजू लोकांसाठी वृद्धाश्रमाची सोय करणार आहे व प्रत्येक नागरिकांना काही ना काही देण्याचा प्रयत्न करणार आजपर्यंत आपण चांगल्या लोकांना सहकार्य करत आहात असेच एकदा दिव्यांग बांधवाला पण सहकार्य करा व आपल्या सेवेची संधी द्या.