मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):-भारतामध्ये लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होत असलेल्या घसरणीमुळे देशातही इंधनाचे दर कमी व्हायचे संकेत मिळत आहेत. क्रुड ऑईल सहा महिन्यांच्या निच्चांकी दरावर येऊन पोहोचले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये जवळपास 4 टक्क्यांची घट झाली आहे. ब्रेंट क्रुड ऑईल ङउजल1 फ्यूचर्स 3.76 डॉलर म्हणजेच 3.7 टक्के घसरणीसह 96.78 बॅरलवर आलं. 21 फेब्रुवारीनंतरची ही निच्चांकी किंमत आहे.
भारत कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात करतो. भारताला गरजेच्या 85 टक्के इंधन बाहेरून विकत घ्यावं लागतं, ज्याच्याबदल्यात डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात.