नाशिक :– एटीएम पिन जनरेट करण्याचा बहाणा करून महिलेची नजर चुकवून 23 हजार 100 परस्पर काढून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार द्वारकाजवळ घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की सौ. अर्चना श्रीराम रोकडे या 3 जून रोजी द्वारका वरील एटीएम सेन्टर मध्ये नवीन पिनकोड जनरेट करण्यासाठी गेल्या होत्या.

याकामी त्यांना मदत करत असताना एका इसमाने त्यांची नजर चुकवून एटीएम कार्डमध्ये अदलाबदल केली. नंतर त्याने त्या महिलेच्या खात्यातून 23 हजार 100 रुपये परस्पर काढून त्यांची फसवणूक केली.
हे समजताच रोकडे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. बी. मोहिते करीत आहेत.