Nashik crime : महिलेला गुंगीचे औषध देऊन तिघा नराधमांकडून लैंगिक अत्याचार

सिन्नर :- काम देण्याच्या बहाण्याने 2 महिलांच्या मदतीने मजुरी करणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिघा नराधमांनी महिलेवर आळी पाळीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील ही महिला माळेगाव औद्योगिक वसाहतीत मजुरी करून उदरनिर्वाह करते. 30 नोव्हेंबर रोजी ही महिला नोकरीच्या शोधात माळेगाव एमआयडीसी येथे जात होती. तेव्हा सिन्नर वेस जवळ 2 महिला तिला भेटल्या आणि आम्ही काम देतो, तू आमच्या सोबत चल असे म्हणत तिला सिन्नर शहरातील जोशी वाडी येथे घेऊन गेल्या. त्या दोघींचे नाव बुटी, प्रेरणा असे होते. तेव्हा घरात भाऊसाहेब उर्फ भावड्या दोडके देखील होता.

त्या तिला म्हणाल्या की, बाई तुझी तब्येत बरी राहत नाही, तू येशूची प्रार्थना कर, तुला बरे वाटेल आणि तुझी आर्थिक स्थिती पण सुधारेल असे सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी तेथे राहुल फादर यांना तेथे बोलावून घेतले. फादरने तिला लाल रंगाचे पाणी पाजले आणि एक धार्मिक पुस्तक दाखवले. थोड्या वेळाने तिला गुंगी आल्याने ती तेथेच झोपली. त्या रात्री बुट्टी आणि प्रेरणा यांनी पीडित महिलेला डांबून ठेवले. भावड्याने तिच्याशी बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर 2 डिसेंबर २०२२ रोजी ती झोपलेली असताना भावड्या, राहुल फादर व एक अनोळखी इसम या तिघांनी तिच्यावर आळी पाळीने लैंगिक अत्याचार केला. नंतर तिला चौघांनी मारहाण करत झालेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या मुलांना भीक मागण्यास भाग पाडत महिलेला शिवीगाळ आणि दमदाटी करून मारहाण केली.

शेवटी 29 डिसेंबर रोजी पती एका व्यक्तीला सोबत घेऊन आल्यानंतर तिच्या चौघांच्या तावडीतून सुटका झाली आणि तिला घडलेला सर्व प्रकार पतीला सांगितला. शेवटी नगरच्या एका महिलेच्या मदतीमुळे त्यांनी पोलीस ठाणे गाठत त्या पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!