नाशिक (प्रतिनिधी) :- बनावट सात-बारा उतारा तयार करून तो खरा असल्याचे भासवून महिलेची फसवणूक करणार्या चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी किशोर झुंबरलाल खिंवसरा (वय 60, रा. गीतांजली सोसायटी, गंगापूर रोड, नाशिक) यांची बहीण मनीषा झुंबरलाल खिंवसरा हिने पाथर्डी शिवारात प्लॉट क्रमांक 84 हा अशोक शबाजी पाटील यांच्याकडून फेब्रुवारी 2007 च्या पूर्वी दि. 21 ऑक्टोबर रोजी खरेदी केलेला होता, तसेच फिर्यादीची बहीण मनीषा खिंवसरा हिचे सात-बारा उतार्यावर अधिकारामध्ये नाव नोंदविलेले असतानादेखील आरोपी रमेश भटू जाधव (रा. विसे मळा, कॅनडा कॉर्नर, नाशिक), मिथिला अशोक खताळे, पयस्विनी अशोक खताळे (दोघेही रा. पुणे), मोहनदास वसंतराव महाले (रा. मंगलमूर्ती अपार्टमेंट, तोरणानगर, सिडको, नाशिक) यांनी बनावट सात-बारा तयार करून तो खरा असल्याचे भासवून पुन्हा खरेदी दाखविली.
याप्रमाणे या चारही आरोपींनी मनीषा खिंवसरा यांची फसवणूक करून आर्थिक नुकसान केले. हा प्रकार दि. 21 ऑक्टोबर 1991 ते दि. 1 फेब्रुवारी 2007 या कालावधीत घडला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद करीत आहेत.