वाइन पिऊन गाड़ी चालवली तर चालेल का? नेटकऱ्याच्या या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई पोलीस म्हणाले…

 

मुंबई :- नुकतीच महाराष्ट्र सरकारने आता किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाइनची खरेदी आणि विक्री करता येईल, असा निर्णय जाहिर केला. त्याला विरोधकांनी टिकेची झोड़ उठवली. त्यात एका नेटकर्याने मुंबई पोलिसांनी मजेशीर प्रश्न विचारला होता, त्याला पोलिसांनी ही तितकेच मजेशीर उत्तर दिले.

हा निर्णय जाहिर झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी वाइनची विक्री शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, “वाइन म्हणजे दारू नाही. वाइनची विक्री वाढली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हे केले आहे. भाजपा फक्त विरोध करते पण शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही,”

https://twitter.com/MumbaiPolice/status/1487247552332574720?t=4al7qrdihhm5p-zu7P-8nQ&s=19

राऊत यांच्या या विधानावर एका यूजरने ट्विटरवर मुंबई पोलिसांना, “मी वाइन पिऊन गाडी चालवली तर मुंबई पोलीस मला तुरुंगात टाकतील की मला जवळचा बार दाखवतील असा सवाल विचारला. या प्रश्नाला उत्तर देतांना मुंबई पोलिसांनी उत्तर की, “सर, एक ‘जबाबदार नागरिक’ म्हणून तुम्ही मद्यधुंद अवस्थेत बारमधून उठून ड्रायव्हर असलेल्या गाडीत बसण्याची शिफारस करतो.” यासोबतच, “जर तुम्ही दारूच्या नशेत गाडी चालवली आणि ब्रेथलायझरमध्ये तुमच्या ड्रिंकमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळलं, तर तुम्हाला आमचे पाहुणे बनावे लागेल,” असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!