नाशिक :– विजेचा करंट पाण्यात उतरल्याने शॉक लागून जुने नाशिकमधील एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

काल नाशिकमध्ये धुवाधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. वाहतूक खोळंबली होती. उड्डाणपुलावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. बबलू बकील खान (वय 23, रा. नानावली, जुने नाशिक) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
बबलू हे काल रात्री 10.30 वाजता द्वारकाकडून पखालरोडकडे सायकलवरून जात असताना पखालरोड वर खांबातून विद्युत पुरवठा उतरल्याने त्याच्या सायकलला करंट लागून तो खाली पडला. त्याच्या भावाने उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. पुढील तपास पोलीस नाईक बी. एच. भोये करीत आहेत.