देवळाली गावात दोन दुचाकींची समोरासमोर धडक; युवक जागीच ठार

नाशिकरोड (प्रतिनिधी) :- देवळालीगाव येथील घोलप वाडा समोर दोन ऍक्टिव्हा दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळालीगाव येथील घोलप वाडा समोर रात्री 12:30 वाजेच्या सुमारास जेलरोड येथील महाजन हॉस्पिटल मागे राहणारा सुजल उपेंद्रसिंग बुंदीले (वय 19) हा युवक देवळाली कॅम्पकडे ऍक्टिव्हा क्र. MH15 GP 2948 वरून जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या MH15 GW 9894 या क्रमांकाच्या ऍक्टिव्हाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भयानक होती की, सुजलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि अतिरक्तस्रावामुळे त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला.

धडक देणारा ऍक्टिव्हा चालक अपघातानंतर गाडी घटनास्थळी सोडून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे आणि अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!