नाशिक :- पोस्टात नोकरी देण्याच्या बहाण्याने व नोकरीची खोटी ऑर्डर देऊन एका युवकास 8 लाख रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

यवतमाळ येथील रहिवासी शरद दत्तात्रय आडे यांनी याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आडे यांचा मुलगा पृथ्वीन यास नाशिकरोड पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून परिसरात राहणारे विनोद शेळके, देवानंद गायकवाड, शेंडे व घोष बाबू (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी शरद आडे यांना यवतमाळ येथून आणले.
त्यानंतर नाशिकरोड परिसरात वरील चौघांनी आडे यांना त्यांच्या मुलाच्या नावाची बनावट नोकरीची ऑर्डर दिली व त्यांच्या कडून 8 लाख रुपये रोख घेतले. यावेळी आडे यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठत सर्व प्रकार सांगितला.
दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी वरील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून विनोद शेळके यास अटक केली आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत आहेत.