नासिक (प्रतिनिधी)- नाशिक शहर आणि परिसरामध्ये बिबट्याचा वावर सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास म्हसरुळ येथे बिबट्याने हल्ला केल्यामुळे 29 वर्षीय युवक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.
नाशिक शहर आणि परिसरामध्ये सातत्याने बिबट्याचा वावर असल्याचे समोर येत आहे अगदी मागील दीड महिन्यापूर्वी सातपूर येथील एका नागरिकांच्या घरात बिबट्या घुसला होता त्यानंतर शहरातील पाथर्डी परिसर व लगतच्या परिसरामध्ये बिबट्या असल्याचे समोर आले होते याबाबत नागरिकांनी तक्रारी देखील केल्या होत्या परंतु या ठिकाणी बिबट्या दिसला आणि रविवारी रात्री शहरातील म्हसरूळ या परिसरामध्ये बिबट्याने एका युवकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार म्रहसरुळ परिसरामध्ये असलेल्या वरवंडी येथील मोरे मळा या परिसरात असलेल्या मोराळे वस्ती वरती राहणारे भारत खंडू याठकर (वय 29) या युवकावर मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास युवक घरा मध्ये झोपलेला असताना अचानक हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये भारत गंभीर जखमी झाला आहे.
त्याच्या डोक्यातला व हाताला चावा घेतला. तातडीने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथक वन अधिकारी भदाणे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी दाखल झाले आणि त्या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी विविध प्रकारचे उपायोजना करण्यात येत आहे.