गरबा खेळतांना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

गांधीनगर : राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह आहे. गरबा आणि दांडीया खेळण्यासाठी गर्दी होत आहे. पण मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली आहे. गरबा खेळतांना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गेल्या आठवड्यात मुलुंडमध्ये शनिवारी १ ऑक्टोबरला घडली.

दरम्यान, नवरात्रीत गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी मुलुंडमध्ये कालिदास नाट्यगृह येथे भाजपने प्रेरणा रास हा कार्यक्रम आयोजित केला आहे. भाजप नेते मनोज कोटक यांनी हा प्रेरणा रास कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रेरणारासमध्ये १ ऑक्टोबरला शनिवारी गरबा खेळतांना तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

ऋषभ मंगे भानुशाली असे या तरूणाचे नाव असून तो २७ वर्षीय असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून तो बोरिवली येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. डोंबिवली पश्चिम येथे तो आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. तो घरात एकटाच कमावता मुलगा असून त्यामुळे त्यांच्या घरावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!