१ जूनपासून पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नियमांमुळे तुमच्या खिशांवर थेट परिणाम होणार आहे. यामध्ये एलपीजी गॅसच्या किंमतीपासून ते क्रेडिट कार्डपर्यंतचे अनेक नियम बदलणार आहे. यामध्ये बँकेच्याही काही नियमांचा समावेश आहे. या नियमांमध्ये बदल झाल्यावर त्याचा थेट परिणाम तुमच्या महिन्याच्या बजेटवर होणार आहे.
१. क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्डच्याही नियमांमध्ये बदल होणार आहेत. ऑटो डेबिट फेल झाल्यावर त्यावर लागणारा २ टक्के दंड कमी होऊ शकतो. याबाबत नियम बदलू शकतो. इंधन आणि युटिलिटी बिल पेमेंटवर लागणाऱ्या शुल्काबाबतचेही नियम बदलू शकतात.
२. पीएफ अकाउंटचे नियम
पीएफ अकाउंटच्या नियमांमध्ये १ जूनपासून बदल झाले आहेत. १ जूनपासून ईपीएफओ ३.० सुरु होईल. यानंतर तुम्ही एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकणार आहात.
३. बँकचे नियम
जून महिन्यापासून बँकेच्या एफडीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो. सध्या हे दर ६.५ ते ७.५ टक्के आहे. आरबीआयच्या नवीन पॉलिसीनुसार हे दर अपडेट होऊ शकतात.
४. एटीएम
एटीएमच्याही नियमांमध्ये बदल होणार आहे. जूनपासून फ्रि लिमिटपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करण्यावर फी वाढू शकते.
५. एलपीजी गॅस
दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती अपडेट होतात. त्यामुळे जून महिन्यातदेखील एलपीजी गॅसच्या किंमती बदलणार आहेत.
६. पेट्रोल डिझेल
जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेट्रोल डिझेलच्या पेमेंटवरील चार्जमध्ये बदल होऊ शकतात. यामुळे क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करताना तुम्हाला कदाचित जास्त चार्ज किंवा कमी चार्जदेखील लागू शकतो.