पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे वैष्णवी हगवणे या तरुणीने ६ मे रोजी राहत्या घरी गळफास घेतला होता. सासरच्या जाचाला कंटाळून तिने हा टोकाचा निर्णय घेतला असलायचं समोर आले आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, या प्रकरणात वैष्णवीचा पती आणि सासु, सासरे आणि नणंद, दीर अशा सर्वांनाच अटक झाली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अखेर IG जालिंदर सुपेकरांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जालिंदर सुपेकर यांची आता उपमहासमादेशक होमगार्ड पदावर बदली झाली आहे. या प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे यांचे ते मामा लागत असून त्यांना दिलेल्या शस्रपरवान्यावर सुपेकर यांची सही असल्याचे उघडकीस आले होते. सुपेकर यांचे अतिरिक्त पदभार कालच काढण्यात आले असताना आज त्यांची थेट आयजी ( पोलीस महानिरीक्षक ) पदावरून होमगार्डमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे सुपेकर यांनी डबल फटका बसला आहे.
आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर गृहविभागानेही कालच मोठी कारवाई केली होती. जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला होता. त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला होता. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपांनंतर जालिंदर सुपेकर यांचे हे अतिरिक्त कार्यभार काढले होते. जालिंदर सुपेकर हे वैष्णवी यांचे पती शशांक हगवणे याचे मामा लागतात.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांवरही सुरुवातीपासून आरोप झाले होते. या आरोपानंतर या प्रकरणात आरोपींनी पोलीसांची काही मदत असेल तर चौकशी केली जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. या प्रकरणात हगवणे बंधूंना शस्र परवाना देताना नियमबाह्यपणे दिल्याचा ठपका आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावर होता. त्यांच्या अर्जावर आयजी जालींदर सुपेकर यांची सही होती. शिवाय ते हगवणे बंंधूंचे मामा लागत होते असे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांची आयजी पदावरुन उचल बांगडी करण्यात आली आहे. आता त्यांना होमगार्डचे उपमहासमादेशक म्हणून साईड पोस्टींग दिल्याचे म्हटले जात आहे.