वैष्णवीचा पती शशांक हगवणे याच्याकडे शस्त्र आहे. हगवणे बंधुंकडे तीन शस्त्र आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारावर त्यांनी हे शस्त्रास्त्र परवाने मिळवले. हगवणे बंधुंच्या शस्त्रास्त्रांच्या फाईलवर आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची सही आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत.

नात्यात जालिंदर सुपेकर हे हगवणे बंधुंचे मामा लागतात. आता जालिंदर सुपेकर यांनी त्या फाईलवर त्यांची जी स्वाक्षरी आहे, त्यावर एका वृत्त वहिनीला स्पष्टीकरण दिलं आहे.
हगवणे बंधुंनी खोटा पत्ता दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्रास्त्र परवाना मिळवला होता. आता जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला जातोय.
दरम्यान आता आयपीएस जालिंदर सुपेकर यांनी हगवणे बंधुंना शस्त्रास्त्र परवाना दिल्याच्या प्रकरणात आपण जबाबदार नसल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अमिताभ गुप्ता तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त होते. त्यांच्या परवानगीनंतर आपण फाईलवर सही केली, असं जालिंदर सुपेकरांच म्हणणं आहे. त्यांनी एका वृत्त वहिनीला हे स्पष्टीकरण दिलय. जालिंदर सुपेकर त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशासन म्हणून कार्यरत होते.
हगवणे बंधुंना शस्त्रास्त्र परवाना कोणामुळे मिळाला?
या शस्त्रास्त्र परवान्याच्या फाईलवर सुपेकरांची सही आहे, हे समोर आल्यानंतर सुपेकरांच म्हणणं आहे की, पुणे पोलीस आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर मी सही केली. मी त्याला जबाबदार नाही, असं सांगण्याचा ते प्रयत्न करतायत. अमिताभ गुप्ता यांनी हगवणे बंधुंना शस्त्र परवाना दिला, असं ते अप्रत्यक्षपणे सांगत आहेत. हगवणे बंधुंनी 2022 साली पुणे पोलीस ग्रामीणकडे शस्त्रास्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता.