मोठी बातमी ! मालेगाव-डोंगराळे चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी अखेर नराधमाला फाशीची शिक्षा
मोठी बातमी ! मालेगाव-डोंगराळे चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी अखेर नराधमाला फाशीची शिक्षा
img
Nandini khandare More

नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची घटना दहा महिन्यांपूर्वी घडली होती. 

दरम्यान आता  या अत्याचार-हत्या प्रकरणाचा आज शुक्रवारी फैसला झाला. चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल जाहीर करण्यात आला.  मालेगाव अपर जिल्हा व सत्र न्यायालयात आज शुक्रवारी निकाल जाहीर करत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात कोर्टाने दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणत नराधमाला फाशीची दिली. या प्रकरणाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं.

मालेगावच्या डोंगराळे भागात १६ नोव्हेंबर २०२५ रोजी ही घटना घडली होती. आरोपी विजय खैरनार यावर दोषी असल्याचे आरोपी निश्चिती झाली होती.  या प्रकरणात शासन नियुक्त विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत होती.  त्यानंतर आज कोर्टाने न्याय दिल्याने मालेगावकरांनी समाधान व्यक्त केलं.

नेमकं काय घडलं होत ? 
आरोपी खैरनारने डोंगराळे येथील रहिवासी असलेल्या चार वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिचं अपहरण केलं होतं. यानंतर आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे पीडित चिमुकली आरोपीला 'दादा' म्हणायची. मात्र त्याने 'दादा' नावालाच कलंक फासला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group