महागाईचा तडाखा! कांदा-साखरेपासून डाळी-तांदळापर्यंत सर्वच  महागले ?
महागाईचा तडाखा! कांदा-साखरेपासून डाळी-तांदळापर्यंत सर्वच महागले ?
img
Nandini khandare More
सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसू लागली आहे. आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता किराणा बाजारातूनही मोठा धक्का बसला आहे. कांदा आणि साखरेच्या दरात वाढ झाली असून डाळी आणि तांदळाचे भावही वधारले आहेत. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकाचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या वस्तूचे दर कितीने वाढले? जाणून घ्या किराणा बाजारातील नवे दर...

महागाईचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर स्पष्टपणे दिसायला लागला आहे. रोजच्या जेवणात लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढल्यामुळे घरखर्च सांभाळणं कठीण होतंय. महत्त्वाचं म्हणजे फक्त सर्वसामान्यच नाही, तर चांगलं उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही या महागाईचा फटका बसतोय. कांदा, साखर, तांदूळ, डाळी आणि खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे महिन्याचं बजेट कोलमडलेलं असून किराणा खरेदी करताना ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागतायेत.

कांद्याच्या दरात सर्वात जास्त वाढ गेल्या वर्षभरातल्या किराणा वस्तूंच्या किमती पाहिल्या तर कांद्याच्या किंमतीत सर्वात जास्त वाढ झाल्याचं दिसतंय. नोव्हेंबर २०२५ मध्ये कांद्याचा किलोचा भाव २७ रुपये होता. तर आता तो ५४ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच कांद्याच्या किंमतीत जवळपास १०० टक्क्यांनी वाढ झाली. साखरेच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४७ रुपये किलो असलेली साखर आता ६१ रुपयांवर पोहोचली. तर कोथिंबिरीची किंमत ३७ रुपयांवरून ४५ रुपये झाली. तूरडाळीचा भाव ११६ रुपयांवरून १३६ रुपये झाला.

खाद्यतेल आणि तांदळाचे दरही वाढले खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे. सूर्यफूल तेलाचा दर १६५ रुपयांवरून १९१ रुपये, तर मोहरीच्या तेलाचा दर १८७ रुपयांवरून २१२ रुपये झाला आहे. तांदळाचे दरही ४३ रुपयांवरून ४९ रुपये झाले आहेत. तसेच उडीद डाळ, लाल मिरची, अंडी, तूप आणि दुधाच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे.
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group