छठपूजेवरून वाद सुरू असतानाच बेस्टचा मोठा निर्णय! १५-१६ नोव्हेंबरला  विशेष बससेवा
छठपूजेवरून वाद सुरू असतानाच बेस्टचा मोठा निर्णय! १५-१६ नोव्हेंबरला विशेष बससेवा
img
Nandini khandare More
मुंबईत छठपूजेच्या आयोजनावरून राजकीय वाद सुरू असतानाच बेस्ट प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी छठपूजेसाठी जाणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बेस्टकडून २२ अतिरिक्त बसगाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे जुहू चौपाटीसह विविध ठिकाणी छठपूजेसाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवासात दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , १५ आणि १६ नोव्हेंबर २०२६ रोजी एकूण २२ अतिरिक्त बसगाड्या चालवण्याची तयारी करण्यात आली आहे. रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी १५ जादा बसगाड्या सेवेत दाखल होणार आहे.

दुपारी २ वाजल्यापासून विशेष बससेवा सुरू होणार.

सांताक्रूझ पश्चिम, अंधेरी पश्चिम, मजास डेपो, मालवणी डेपो आणि बोरिवली पश्चिम येथून जुहू बीचकडे बसगाड्या धावणार

बसमार्ग क्रमांक २३१, २०३, ३३९, ए-२५६ आणि ए-२०३ या मार्गांवर अतिरिक्त बससेवेचे नियोजन

सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ७.३० दरम्यान ६ ते ७ अतिरिक्त बसगाड्या चालवल्या जाणार

जुहू बीच आणि जुहू बसस्थानक येथून सांताक्रूझ पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि बोरिवली पश्चिमकडे परतीची बससेवा उपलब्ध असेल.

जुहू बीच, दादर चौपाटी, पवई आणि गोराई खाडी परिसरात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन विशेष व्यवस्था.

बॅकबे, वरळी, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई, दिंडोशी, विक्रोळी आणि मुलुंड येथील डेपो व्यवस्थापकांना विशेष सूचना
इतर बातम्या
Join Whatsapp Group