मोठी अपडेट  ! दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सर्वात मोठी अपडेट आली समोर
मोठी अपडेट ! दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सर्वात मोठी अपडेट आली समोर
img
Nandini khandare More

सध्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असून आता राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.  गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अजितदादांच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. खासदार पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात एकाच दिवशी दोन वेळा बैठक झाली. या बैठकसत्रांमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले आहे. दरम्यान, आता दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनकरणावर सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. शरद पवार यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सूत्रांना माहिती दिलीय.

नेमकी काय माहिती समोर आली?
सध्या दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा सुरू नाही, असे शरद पवार यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सूत्रांना सांगितले आहे. सोबतच सध्या विलीनीकरणाची परिस्थिती नाही, असेही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनकरण होणार नाही, असे आता बोलले जात आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांत काय काय घडलं?
शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दोन दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले. ते रुग्णालयात असताना त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अनेक महत्त्वाचे नेते रुग्णालयात दाखल झाले होते. यात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश होता. त्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या विलीकरणाच्या चर्चेला हवा मिळाली. त्यानंतर पार्थ पवार यांनीही एकाच दिवशी शरद पवारांची भेट झाली. तीन ते चार तास दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इतरही बडे नेते उपस्थित होते.

तटकरेंनी केलेल्या विधानाने एकच खळबळ
या सर्व घडामोडी घडत असताना खासदार सुनील तटकरे यांनीही विलीनीकरण होणार होते. अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असते, असे बोलून खळबळ उडवून दिली. त्याआदी अजितदादांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर दबाव निर्माण व्हावा, यासाठी ही राजकीय खेळी खेळण्यात आली होती, असा तर्क लावला जात होता. परंतु आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनीच विलीनीकरणावर सध्याच चर्चा नाही, असे सांगितल्याने भविष्यात नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group