तिसऱ्या वनडे सामन्या आधी टीम इंडियात मोठा बदल! कोणाची होणार एन्ट्री?
तिसऱ्या वनडे सामन्या आधी टीम इंडियात मोठा बदल! कोणाची होणार एन्ट्री?
img
Nandini khandare More
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची चर्चा रंगली आहे. मालिकेत भारताने आघाडी घेतल्यानंतर आता संघ व्यवस्थापन वेगवान गोलंदाजीच्या आघाडीत बदल करू शकते. दरम्यान, भारतीय संघ कोणत्या नव्या रणनीतीसह मैदानात उतरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी हॅमिल्टनच्या सेडॉन पार्कवर खेळवला जाणार आहे. पहिले दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि टीम मॅनेजमेंट प्लेइंग-इलेव्हनमध्ये काही महत्त्वाचे बदल करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला विश्रांती दिली जाऊ शकते, तर त्याच्या जागी अनुभवी गोलंदाज मोहम्मद सिराज याला अंतिम संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

संभाव्य प्लेइंग-इलेव्हनवर नजर मालिकेनंतर होणाऱ्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी मोहम्मद सिराजला मॅच प्रॅक्टिस मिळावी, हा यामागे मुख्य उद्देश असू शकतो. फलंदाजीत कर्णधार शुभमन गिलसह रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. भारताची संभाव्य प्लेइंग-इलेव्हन: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कम्बोज, आकिब नबी, गुरनूर बरार आणि मोहम्मद सिराज.

इतर बातम्या
Join Whatsapp Group