शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी;  रूग्णालयातून डिस्चार्ज; आता प्रकृती कशी आहे?
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी; रूग्णालयातून डिस्चार्ज; आता प्रकृती कशी आहे?
img
Nandini khandare More
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवार यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. 

शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. छातीत संसर्ग आणि खोकल्याचा त्रास जाणवल्यानं त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले असून, आता त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ते थेट मुंबईतील त्यांच्या 'सिल्व्हर ओक्स' या निवासस्थानी रवाना झाले आहेत. 


शरद पवार यांना गेल्या दोन दिवसांपूर्वी छातीत संसर्ग  आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यामुळे उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर शरद पवारांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर झाली आहे. त्यांच्या सर्व चाचण्या आणि आरोग्याची स्थिती समाधानकारक असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर ते आपल्या 'सिल्व्हर ओक्स' या निवासस्थानी सुखरूप पोहोचले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group