महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. मुरासू चक्रीवादळ किनारपट्टीला धडकल्याने हवामान यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे. नेमका कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा फटका बसणार? जाणून घेऊया या बातमीतून सविस्तर.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मुरासू’ या अत्यंत तीव्र चक्रीवादळाने अखेर किनारपट्टीवर जोरदार धडक दिली आहे. मध्यरात्री १ वाजताच्या आसपास ‘मुरासू’ चक्रीवादळानेदक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला तडाखा दिला. ताशी ५० ते ६० किलोमीटरच्या वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पावसामुळे आंध्रच्या किनारपट्टी भागात मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी विध्वंस झाला आहे.
या चक्रीवादळाच्या तीव्र प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामानातही अचानक मोठा बदल झाला आहे. मुरासूमुळे राज्यात वादळी पावसासाठी (District wise rain alert Maharashtra) अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आज अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असणार आहे. मागील दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.