आता दारूची ऑनलाईन बुकिंग ! कोणत्या ॲपवर मिळणार सुविधा? वाचा संपूर्ण माहिती
आता दारूची ऑनलाईन बुकिंग ! कोणत्या ॲपवर मिळणार सुविधा? वाचा संपूर्ण माहिती
img
Nandini khandare More

मद्यप्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे ! आता दारू खरेदी करण्यासाठी दुकानात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी मोबाईलवरूनच ऑनलाईन बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची चर्चा आहे. सरकारच्या या नव्या उपक्रमामुळे मद्य खरेदीची प्रक्रिया अधिक सोपी आणि डिजिटल होण्याची अपेक्षा आहे. मात्र, ही सुविधा नेमकी कुठे सुरू झाली आहे, कोणत्या ॲपवरून बुकिंग करता येणार आहे आणि दारूची होम डिलिव्हरी मिळणार की दुकानातूनच घ्यावी लागणार, असे अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. त्यामुळे ऑनलाईन दारू बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया, वयोमर्यादा आणि महत्त्वाचे नियम जाणून घेऊया.

आता दिल्लीत ऑनलाईन दारू बुक करता येणार आहे. दिल्ली सरकारने दुकानातील गर्दी कमी करण्यासाठी नव्या अॅप लॉन्च केला आहे. दिल्ली लिकर बुकिंग'  नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन दिल्ली सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे आता मद्यप्रेमींना ऑनलाइन बुकिंगद्वारे दारू उपलब्ध होणार आहे.

युजर्स या ॲपवरून उपलब्ध ब्रँड पाहू शकतात, विशिष्ट किरकोळ दुकान निवडू शकतात आणि दारूच्या बाटल्यांचे प्रमाण ठरवून ऑनलाइन पेमेंट करू शकतात. पेमेंट झाल्यानंतर एक क्यूआर कोड जनरेट होतो. ऑर्डर गोळा करण्यासाठी तुम्हाला निवडलेल्या दुकानावर हा कोड दाखवावा लागेल. हे ॲप फक्त दुकानावरून स्वतः जाऊन दारू आणण्यासाठी (स्टोअर पिकअप) आहे. याची होम डिलिव्हरी उपलब्ध नाही.

एकदा बुकिंग आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ४८ तासांच्या आत निर्धारित दुकानातून तुमची ऑर्डर घ्यावी लागेल. दिल्लीच्या उत्पादन शुल्क (excise) नियमांनुसार, ॲप वापरण्यासाठी आणि दारू खरेदी करण्यासाठी तुमचे वय किमान २५ वर्षे असणे आवश्यक आहे. कायदेशीर नियमांनुसार, कोणतीही व्यक्ती जास्तीत जास्त ९ लिटर व्हिस्की आणि १८ लिटर बिअर खरेदी करू शकते.

ही सुविधा सध्या केवळ DSIIDC द्वारे चालवल्या जाणाऱ्या दुकानांसाठी लागू आहे (राजधानीत अशा जवळपास २०८ शाखा आहेत). दिल्लीत ७०० हून अधिक किरकोळ दुकाने चालवणाऱ्या चार सरकारी महामंडळांपैकी इतर महामंडळांच्या दुकानांना ही सुविधा लागू नाही. पिकअप करण्यापूर्वी ॲपद्वारे ऑर्डर रद्द करता येते. पण एकदा उत्पादने गोळा केल्यानंतर किंवा हातात आल्यावर परतावा किंवा रिफंडची (परतफेडीची) कोणतीही तरतूद यामध्ये करण्यात आलेली नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group