Bank Holiday: उद्या बँकेत जाण्यापूर्वी ही बातमी वाचा ! कोणत्या राज्यांत बँका बंद?
Bank Holiday: उद्या बँकेत जाण्यापूर्वी ही बातमी वाचा ! कोणत्या राज्यांत बँका बंद?
img
Nandini khandare More
बँक ग्राहकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. उद्या म्हणजेच बुधवारी म्हणजे २१ ऑक्टोबर रोजी जर तुम्ही बँकेत काही काम असतील तर हि बातमी तुमच्यासाठी आहे .कारण बुधवारी बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंडरनुसार,काही राज्यांमध्ये बुधवारी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर बँकेत जाण्याचा विचार करणार असाल तर तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. आरबीआयने बुधवारी बँकांना सुट्टी का दिली हे आपण जाणून घेणार आहोत...

मंगळवार म्हणजे आज २० नोव्हेंबर रोजी दसऱ्यामुळे अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे. आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, आसाम, कर्नाटक, केरळ, सिक्कीम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये विजयादशमी आणि दुर्गा पूजेमुळे बुधवार २१ ऑक्टोबर रोजी बँका बंद राहणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यासह सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका या राज्यांमध्ये बुधवारी बंद राहणार आहेत.

दसरा आणि विजयादशमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. धार्मिक श्रद्धेनुसार याच दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता. या निमित्ताने देशभरात रावणाचे दहन केले जाते. काही राज्यांमध्ये विजयादशमी हा सण देवी दुर्गामातेचा महिषासुरावरील विजय म्हणूनही साजरा केला जातो. या सणामुळे आसाम, कर्नाटक, केरळ आणि सिक्कीमसह अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

दुर्गा पूजा हा देवीच्या पूजेसाठी समर्पित एक प्रमुख सण आहे. हा सण विशेषतः पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाममध्ये मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात गणेशोत्सव सण साजरा केला जातो तसं या राज्यांमध्ये दुर्गापूजा हा सण साजरा केला जातो. आज कुठे बँका बंद आणि कुठे सुरू? दसरा, विजयादशमी, महानवमी, आयुधा पूजा आणि दुर्गापूजा यानिमित्ताने आज बँका बंद आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, बिहार, झारखंड, कर्नाटक, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहणार आहेत. सिक्कीम आणि मणिपूरमध्ये आज बँका सुरू आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group