एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. खासदाराच्या कारणे दुचाकीला जोरदार धडक देऊन भीषण अपघाताची घटना घडली आहे.
मध्यप्रदेशातील बालाघाट येथील भाजप खासदार भारती पारधी यांच्या वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली आहे. भंडाऱ्यातील तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील उसर्रा येथे हा अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून जाणारे २ जण गंभीर
सुरजित सिंग आणि तसमिरा मेहरा अशी अपघातातील जखमी झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही पंजाबचे रहिवासी असून भंडारा जिल्ह्यात भात कापणीच्या 'हार्वेस्टर' मशीनवर मजूर म्हणून कामासाठी आले होते. जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
खासदार भारती पारधी या स्वतः आपल्या वाहनातून बालाघाट येथून नागपूरच्या दिशेने प्रवास करत होत्या. तुमसर तालुक्यातील उसर्रा गावाजवळ त्यांच्या भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मजुरांना उपचारासाठी तातडीने भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आंधळगाव पोलिसांनी अपघाताची नोंद करून चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.