भाजप खासदार कंगना रणौत या त्यांच्या विधानाने चर्चेत असतात. दरम्यान आता पुन्हा एकदा एक कारणाने कंगना रणौत चर्चेचा विषय ठरल्या आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधणारी एक वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. मात्र, या पोस्टमधील विधानांमुळे आता कंगना रणौत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात हिमाचल प्रदेशातील शिमला येथे एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.
कंगना रणौत यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्ये देखील मोठ्या प्रमाणात केली जातात. काही दिवसांपूर्वी कंगना यांनी सोशल मीडियावर गांधी कुटुंबाविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कंगना यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूबाबत वादग्रस्त भाष्य केलं होतं. कंगना रणौत यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कंगणा यांनी 10 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी यांच्या मृत्यूवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते.
एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर कंगना रणौत यांच्याविरोधात एफआआर नोंदवण्यात आला. रणौत यांच्या विरोधातील तक्रारीत सायबर फॉरेन्सिक चौकशी मागणी करण्यात आली. सोनिया गांधी यांचाही उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आलाय. तसेच राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर मेनका गांधी यांना अचानक कुटुंबाच्या घरातून बाहेर काढण्यात आलं, असा आरोप कंगना यांनी केला होता.
कंगना यांच्या पोस्टमधील दावे खोटे असून यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे, असे तक्रारीत म्हटलंय. या जनतेत दहशत निर्माण व्हावी, या हेतूने पोस्ट करण्यात आली, असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय.