न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाची अक्षरशः दाणादाण उडाली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने विल यंगच्या झंझावाती शतकाच्या जोरावर ५० षटकांत ३३३ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात ३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांचा डाव अवघ्या ८९ धावांवर आटोपला. मॅट हेन्रीने २७ धावा देत ६ विकेट्स घेत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. परिणामी न्यूझीलंडने भारताचा तब्बल २४४ धावांनी पराभव केला. हा भारताच्या वनडे इतिहासातील धावांच्या फरकाने झालेला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव ठरला.
न्यूझीलंडने भारतीय क्रिकेट संघाचा तब्बल 244 धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे. चौथ्या वनडे मध्ये न्यूझीलंडच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 333 धावा केल्या. विजयसाठी दिलेल्या 334 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 89 धावात आटोपला. ज्या पीचवर न्यूझीलंडच्या टीमने 300 प्लस रन्स केल्या. तिथे भारतीय फलंदाजांना 100 धावाही करता आल्या नाहीत. याचा अर्थ पीच मध्ये प्रॉब्लेम नव्हता तर भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा मुकाबला करु शकले नाहीत.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे भारताचे टॉप फलंदाज 10 धावांच्या आत तंबूत परतले. 9 रन्सवर चार विकेट अशी स्थिती होती. रोहित शर्मा पहिल्याच बॉलवर आऊट झाला. रोहितने भोपळाही फोडला नाही. विराट कोहली सुद्धा शून्यावर आणि श्रेयस अय्यरही भोपळाही फोडू शकला नाही. तिघे शुन्यावर बाद झाले. दुसरा ओपनर ऋतुराज गायकवाडने 5 धावांवर आऊट झाला. मॅट हेनरी भारतीय फलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. त्याने 9.4 ओव्हरमध्ये 27 धावा देत त्याने सहाविकेट काढले. टीम इंडियाकडून इशान किशनने सर्वाधिक 27 धावा केल्या.
अक्षर पेटल (21) आणि नमन धीरने (21) धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त टीम इंडियाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टीकाव धरु शकला नाही. न्यूझीलंडकडून विल यंगने 108 चेंडूत 125 धावांची शतकी खेळी केली. त्याने भारतीय गोलंदाजांची पिसं काढला. 14 फोर आणि चार सिक्स त्याने मारले. टीम सायफर्टने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 85 धावांची पार्टनरशिप केली. पाच सामन्यांच्या वनडे सीरीजमध्ये आव्हान टिकवून ठेवण्यासाठी न्यूझीलंडला विजय आवश्यक होता. मालिकेत आता 2-1 अशी स्थिती आहे.
आता पाचवी वनडे दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. टीम इंडियाला मालिका जिंकण्यासाठी तर न्यूझीलंड मालिका हातातून जाऊ नये यासाठी विजय आवश्यक आहे. टी20 सीरीज आधीच त्यांनी 3-2 ने गमावली आहे. भारताने पहिले दोन्ही सामने डकवर्थ लुईसने जिंकले. न्यूझीलंडच्या आजच्या विजयात जितका शानदारपणा आहे, तितका तो भारताच्या याआधीच्या दोन विजयात दिसला नाही.