सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे घरखर्चाचे गणित बिघडले असताना आता दूधाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा परिणाम रोज दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. दूधाचे जुने दर किती होते? आता नवीन दर किती असणार? दरवाढ कधीपासून लागू होणार? जाणून घेऊया सविस्तर…
मदर डेअरी दूधाच्या दरामध्ये प्रति लिटर २ ते ४ रुपयांची वाढ झाली आहे. हे नवे दर १२ नोव्हेंबर म्हणजे उद्यापासून लागू होणार आहेत. मदर डेअरीने दूधाचे दर वाढण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आले आहे. मदर डेअरीने १४ मे २०२६ रोजीच दूधाचे दर वाढवले होते. त्याआधी एप्रिल २०२५ ला दूधाचे दर वाढवले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून दूध खरेदीचे दर वाढले आहेत. त्यामुळे कंपनीचा खर्च वाढला असून दुधाची किंमत वाढवावी लागली. याचा परिणाम आता ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. मदर डेअरी कंपनी दिल्ली-एनसीआरमध्ये दररोज सुमारे ३५ लाख लिटर दुधाची विक्री करते आणि एकूण कंपनीची दररोज ५० लाख लिटरपेक्षा जास्त दुधाची विक्री होते.
मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांनी दरवाढीवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून दूध खरेदीचे दर वाढले आहेत त्यामुळे कंपनीला वाढीव खर्चाचा काही भाग ग्राहकांवर लादणे भाग पडले आहे. मदर डेअरी आपल्या दूध विक्रीतून मिळणाऱ्या महसुलापैकी ७५-८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना वितरित करते.
मदर डेअरच्या दूधाचे दर किती?
-टोन्ड दूध - ५८ रुपयांवरून ६० रुपये प्रति लिटर झाले.
- फुल क्रीम दूध - ७२ रुपयांवरून ७६ रुपये प्रति लिटर झाले
- टोन्ड दुधाची (पाऊच) किंमत ६० रुपयांवरून ६२ रुपये प्रति लिटर झाली.
- डबल टोन्ड दुधाचा दर ५४ रुपयांवरून ५६ रुपये प्रति लिटर झाल.
- गाईच्या दुधाचा दर ६२ रुपयांवरून ६५ रुपये प्रति लिटर झाला.