महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कुठे थंडीचा जोर वाढताना दिसत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच भारतीय हवामान विभाग अर्थात IMD कडून राज्यातील हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाली असून राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळताना दिसत आहे. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. आता नोव्हेंबर महिन्यात पाऊस कोसळताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.
आज 4 नोव्हेंबर 2026 अजून अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दिवाळीत राज्यात सुखद गारवा जाणवत आहे. अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा प्रभाव ओसरणार आहे. पण पावसाचा अंदाज कायम आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला. पुढील काही दिवसात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
राज्यातील काही भागात आज कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि साताऱ्यात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला.नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. यादरम्यानच राज्यात उष्णता देखील वाढताना दिसेल.