दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि अशातच अमेरिकेतून आलेल्या एका महत्त्वाच्या आर्थिक संकेताने भारतीय सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. सोनं आणि चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे, ज्या सोन्याच्या भावाने काही दिवसांपूर्वी ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चटका लावला होता, त्याच सोन्याचे दर आता खाली येऊ लागले आहेत.
इराण आणि अमेरिका युद्धापूर्वी सोन्याचा भाव गगणाला पोहोचला. मात्र, युद्धाला सुरूवात झाली आणि सोन्याचे भाव धाडकन कोसळले. त्यातच सोन्याचे भाव सातत्याने कोसळताना दिसत आहेत.जागतिक बाजारात सोन्याची घसरण काही कमी होताना दिसत नाहीये. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील महागाई, डॉलरची सध्याची स्थिती आणि बाँड यील्ड यासोबतच भू राजकीय तणाव यामुळे सोन्याचे भाव घसरत आहेत.
भारतात काही मोठे सण आहेत, या सणांच्याच पार्श्वभूमीवर भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री होते. मध्यवर्ती बँकांकडून होणारी खरेदी आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून असलेले सोन्याचे महत्त्व पाहता, दीर्घकाळात त्याचे आकर्षण कायम राहण्याची शक्यता आहे.
त्यातच दोन लाखाच्या आसपास गेलेले सोन्याचे भाव चांगलेच कोसळताना दिसत आहेत. पुढील काही दिवसात सोन्याच्या दरात अजून घसरण होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरात होत आहे.
डिसेंबर महिन्यात अमेरिकेत व्याजदरवाढ होण्याची 78 टक्के शक्यता आहे. भारत सरकारने परकीय चलनावरील दबाव कमी करण्यासाठी सोन्यावरील ड्युटीत मोठी वाढ केली. गेल्या पाच दिवसात सोन्यावरील खरेदीत मोठी अभूतपूर्व वाढ झाली.