आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या बाजारात दरांमध्ये बदल झाल्याने ग्राहकांचे लक्ष सोन्याच्या भावाकडे लागले आहे. आज, सोमवार २६ ऑक्टोबर २०२६ रोजी २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत? १० ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी किती रुपये मोजावे लागतील? तसेच मागील दिवसाच्या तुलनेत सोनं महागलं की स्वस्त झालं? जाणून घ्या आजचे सोन्याचे ताजे दर आणि दरांमधील बदलाची सविस्तर माहिती.
आज सराफा बाजार उघडताच १ तोळं सोन्याची किंमत १७० रुपयांनी वाढलेली आहे. आता भविष्यात या किंमती वाढतील की कमी होतील, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
Goodreturns नुसार, आज दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सोनं-चांदीच्या किंमतीत वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दर घसरत होते. पण आज सराफा बाजार उघडताच ही वाढ पाहायला मिळाली. आज २४ कॅरेट १० ग्रॅमच्या किंमतीत १७० रुपयांनी वाढ झाली. तर २२ कॅरेट १० ग्रॅमच्या किंमतीत १५० रुपयांनी आणि १८ कॅरेट १० ग्रॅमच्या किंमतीत १२० रुपयांनी वाढ झालेली आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यासह इतर शहरांमधले दर जाणून घेणार आहोत.
नाशिकमधील सोन्याचा भाव २४ कॅरेट - १४,२७८ २२ कॅरेट - १३,०८८ १८ कॅरेट - १०,७०९