निळ्या ड्रममधील हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवली होती. या प्रकरणात मुस्कान आणि साहिल यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या निर्णयामुळे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सगळ्यात चर्चेत असेलल्या निळा ड्रम हत्याकांडप्रकरणी कोर्टाने आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. घटनेनंतर एका वर्षाने या केसचा निकाल हाती आला असून मृत सौरभ राजपूतच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२५ मध्ये मर्चंट नेव्हीचे माजी जवान सौरभ राजपूतची हत्या करण्यात आली. मात्र ही हत्या कोणी केली याबाबत गूढ होत. त्याच्या हत्येनंतर शरीराचे तुकडे करून एका निळ्या ड्रमामध्ये पुरण्यात आले. पोलीस चौकशीत ही हत्या सौरभच्या पत्नीने आणि तिच्या बॉयफ्रेंडने केल्याचे उघडकीस आले.
दरम्यान या प्रकरणी गेली १ वर्ष कोर्टात केस सुरु होती अखेर या केसचा अंतिम निकाल समोर आला आहे. या क्समधील आरोपी मुस्कान आणि तिच्या बॉयफ्रेंडला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.