सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मोठी अपडेट; आरटीओ ई-चलनांवर मिळणार २० टक्के सूट?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मोठी अपडेट; आरटीओ ई-चलनांवर मिळणार २० टक्के सूट?
img
Nandini khandare More

वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आरटीओकडून आकारण्यात आलेल्या ई-चलनाच्या दंडाचा बोजा कमी करण्यासाठी डिसेंबरपासून अभय योजना लागू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेअंतर्गत ई-चलनाच्या दंडावर तब्बल २० टक्के सवलत मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर नेमकी कोणती प्रक्रिया राबवली जाणार? कोणाला या योजनेचा लाभ मिळणार? जाणून घेऊया सविस्तर.

सर्व वाहनचालकांसाठी १ डिसेंबर २०२६ पासून महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना-२०२६ लागू होणार असून, पात्र ई-चलनांच्या दंडावर थेट २० टक्के सूट मिळणार आहे. या योजनेमुळे वर्षानुवर्षे रखडलेली थकीत दंडवसुली मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात असून, सवल तीचा कालावधी संपल्यानंतर मात्र थकबाकीदारांवर व वारंवार नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.नाशिक बातम्या

हा केवळ सवलतीचा निर्णय नसून, प्रलंबित वसुलीचा वेग वाढवणे आणि त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी मोकळीक मिळवणे, असा दुहेरी हेतू स्पष्ट होतो.

सवलतीची गाजर आणि मुदतीची कात्रीः टप्पा १ आणि टप्पा ३ मधील सवलतीचा लाभ घेण्यासाठी योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांत, तर टप्पा २ (अर्ली बर्ड) साठी चलान बजावल्यापासून ४५ दिवसांत भरणा करणे बंधनकारक आहे. मुदत चुकल्यास सवल तीचा लाभ गमवावा लागेल. योजना सुरू होण्यापूर्वी भरलेल्या चलान रकमेचा कोणताही परतावा मिळणार नाही. विशेष म्हणजे, जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२६ दरम्यानच्या आणि सक्षम किंवा आभासी न्यायालयात प्रलंबित असलेल्या पात्र चलानांनाही तिसऱ्या टप्प्यात २० टक्के सूट देण्यात आली आहे.

अभय योजनेचा कालावधी संपल्यानंतर थकबाकीदारांवर आणि वारंवार नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर परव- ाना निलंबन, वाहनाचे व्यवहार प्रतिबंधित करणे आणि वाहन जप्ती यांसारखी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आ हेत. वाहतूक पोलिसांच्या गण वेशातील अधिकारी/कर्मचारी किंवा अधिकृत इलेक्ट्रॉनिक प्रणालीमार्फत बजावलेल्या तडजोडपात्र चलानांनाच ही योजना लागू राहील. परिवहन विभागाने (आरटीओ) किंवा त्यांच्या प्रणालीमार्फत बजा-वलेली चलने या योजनेत पात्र ठरणार नाहीत.

एकाच चलानात एक किंवा अधिक विना तडजोडपात्र गुन्हे नोंद असल्यास संपूर्ण चलन सवलतीसाठी अपात्र राहील; सर्व गुन्हे तडजोडपात्र असतील तरच एकत्रित तडजोड होईल. योजना सुरू होण्यापूर्वी भरलेल्या चलान रकमेचा कोणताही परतावा मिळणार नाही. न्यायालयाबाहेरील पात्र चलानांची रक्कम वाहतूक पोलिसांच्या अधिकृत चलान पोर्टलवर ऑनलाईन किंवा जवळच्या वाहतूक पोलीस विभागात रोखीने भरता येईल. योजनेच्या जनजागृतीसाठी येणारा खर्च रस्ता सुरक्षा निधीमधून केला जाणार आहे.

टप्पा योजनेचा प्रकार * टप्पा १: एकवेळची सवलत योजना
२१ जानेवारी २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान बजावलेली व प्रलंबित पात्र ई-चलान २०% सूट, योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांत भरणा आवश्यक

टप्पा २: लवकर भरणा सवलत
१ डिसेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२७ दरम्यानची पात्र ई-चलान २०% सूट, चलान बजावल्यापासून ४५ दिवसांत भरणा आवश्यक

टप्पा ३: प्रलंबित चलानांवरील सवलत
३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ दरम्यानची, सक्षम /आभासी न्यायालयात प्रलंबित पात्र चलान २० टक्के सूट; योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांत न्यायालयाच्या मान्य पद्धतीने भरणा आवश्यक
इतर बातम्या
Nashik : FDA ची

Join Whatsapp Group