यंदाच्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त जाणून घ्या; 'या' वेळेत करा विधिवत पूजा
यंदाच्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त जाणून घ्या; 'या' वेळेत करा विधिवत पूजा
img
Nandini khandare More
दिवाळी म्हटली की रोषणाई, फराळ आणि आनंदासोबतच लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी दिवाळीत देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची विधिवत पूजा केली जाते. मात्र, लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व असल्याने यंदा पूजा नेमकी कधी करावी? पूजेची शुभ वेळ कोणती? जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आणि पूजेविषयी महत्त्वाची माहिती.

लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त कधी? 

२०२६ मध्ये लक्ष्मीपूजन रविवार ८ नोव्हेंबर २०२६ रोजी केले जाणार आहे. या दिवशी कार्तिक अमावस्या आहे. लक्ष्मीपूजनासाठी प्रदोष काळाला विशेष महत्त्व आहे. सूर्यास्तानंतरच्या या काळात माता लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते. मुंबई - संध्याकाळी ६:२७ ते ८:२७ पुणे - संध्याकाळी ६:२४ ते ८:२४ नागपूर - संध्याकाळी ५:५९ ते ७:५८ नाशिक - संध्याकाळी ६:२२ ते ८:२२ छत्रपती संभाजीनगर - संध्याकाळी ६:१६ ते ८:१६ कोल्हापूर - संध्याकाळी ६:२५ ते ८:२६

लक्ष्मीपूजनाचे धार्मिक महत्त्व हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धन, वैभव, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी मानले जाते. दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येऊन भक्तांना आशीर्वाद देते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. कुटुंबातील आर्थिक भरभराटीसाठी देवीकडे प्रार्थना केली जाते. घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, अशी श्रद्धा आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group