जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप ! 25 आमदारांच्या नाराजीने ओमर सरकार संकटात?
जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप ! 25 आमदारांच्या नाराजीने ओमर सरकार संकटात?
img
Nandini khandare More
जम्मू-काश्मीरच्या राजकारणात सध्या मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारसमोर पक्षांतर्गत बंडाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या तब्बल २५ आमदारांनी नेतृत्वासमोर नाराजी व्यक्त करत सरकारमध्ये मोठ्या बदलांची मागणी केल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजपच्या गोटातही हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सत्तासमीकरण बदलणार का? ओमर अब्दुल्ला यांचे सरकार अडचणीत येणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार सध्या जम्मू आणि काश्मीरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. येथे सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या आमदारांचा एक गट नाराज आहे. आमदारांच्या नाराजीनंतर आता या पार्टीतील अंतर्गत असंतोष समोर आल्याचं बोललं जातंय. सूत्रंच्या माहितीनुसार साधारण 18 ते 25 आमदार नाराज असल्याचं सांगितलं जातंय.

आमदारांमध्ये नाराजी कशामुळे?
जम्मू काश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. येथे आमदार नाराज नाराज असल्याचे बोलले जातेय. सत्ताधारी पक्षाने नुकतेच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारावर काही आमदार नाराज आहेत. ही नाराजी वरिष्ठांना कळवण्यात आल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आमच्या नाराजीची दखल न घेतल्यास सरकार उलथवून लावू, असा इशाराही आमदारांनी नॅशनल कॉन्फरन्स तसेच या पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांना दिला आहे.

भाजपाचे घडामोडींकडे लक्ष
नॅशनल कॉन्फरन्स पक्षातील नाराज आमदारांची संख्या अगोदर 18 असल्याचे बोलले जात होते. परंतु आता नाराज आमदारांची संख्या ही 25 असल्याचा दावा केला जातोय. सध्या सत्ताधारी पक्षात घडत असलेल्या या गडामोडींकडे विरोधी बाकावर असलेल्या भाजपाचे संपूर्ण लक्ष आहे. नाराज आमदारांच्या पुढच्या भूमिकेनुसार भाजपा आपले राजकीय डावपेच आखण्याची शक्यता आहे.

जम्मू काश्मीरमधील सत्तास्थापनेचे गणित काय?
जम्मू काश्मीरमध्ये एकूण 90 आमदारांची विधानसभा आहे. सत्ता हवी असेल 46 हा जादुई आकडा गाठणे गरजेचे आहे. 2024 साली झालेल्या विधानसा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला एकूण 42 जागा मिळाल्या होत्या. भाजपाला 29 तर काँग्रेसला 6 आणि पीडीपीला 3 जागा मिळाल्या होत्या.

आमदार स्थापन करू शकतात वेगळा गट
दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्स पक्षातील ही नाराजी वाढत गेल्यास नाराज आमदार आपला वेगळा गट स्थापन करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता खरी ठरली तर आमदार वेगळा गट स्थापन करून भाजपाला पाठिंबा देऊ शकतात. असे झाल्यास नॅशनल कॉन्फरन्सचे तेथील सरकार कोसळू शकते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group