नोव्हेंबरमध्ये बँकांना सलग सुट्ट्या? जाणून घ्या कोणत्या दिवशी शाखा राहणार बंद
नोव्हेंबरमध्ये बँकांना सलग सुट्ट्या? जाणून घ्या कोणत्या दिवशी शाखा राहणार बंद
img
Nandini khandare More

नोव्हेंबर २०२६ मध्ये बँकेत जाऊन महत्त्वाची आर्थिक कामे करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या महिन्यात रविवार, दुसरा व चौथा शनिवार तसेच विविध सणांमुळे बँकांना सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे चेक क्लिअरन्स, पैशांचे व्यवहार, कागदपत्रांची पूर्तता यांसारखी कामे करण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक तपासून घेणे आवश्यक आहे. नोव्हेंबरमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आणि कोणत्या दिवशी बँकेचे कामकाज सुरू असेल, जाणून घेऊया.

दिवाळी, गोवर्धन पूजा, भाऊबीज, छट पूजा आणि गुरु नानक जयंती यांसारख्या सणांमुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. तसेच रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्या नियमित सुट्ट्यांचाही समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेत जाण्याआधी योग्य नियोजन करणं आवश्यक आहे.नोव्हेंबरमध्ये बँका तब्बल १६ दिवस बंद! दिवाळी, भाऊबीज ते गुरु नानक जयंती, एका क्लिकवर पाहा संपूर्ण सुट्टीची यादी

नोव्हेंबरमध्ये बँकांच्या सुट्टया कधी असतील? सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये पुढच्या तारखांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांच्या शाखा बंद राहू शकतात. ९ नोव्हेंबर - दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि गोवर्धन पूजेनिमित्त काही ठिकाणी बँकांना सुट्टी. १० नोव्हेंबर - बाली प्रतिपदा आणि विक्रम संवत नववर्षानिमित्त अहमदाबाद, मुंबई, नागपूरसह काही शहरांमध्ये सुट्टी. ११ नोव्हेंबर - भाऊबीज आणि स्थानिक सणांमुळे गंगटोक, कोलकाता, लखनऊसह काही शहरात बँका बंद. १३ नोव्हेंबर - वांगला सणानिमित्त शिलाँगमध्ये सुट्टी.

१६ नोव्हेंबर - छठ जेनिमित्त पटना आणि रांची येथे बँका बंद. २० नोव्हेंबर - इगास-बग्वाल सणानिमित्त डेहराडूनमध्ये सुट्टी. २३ नोव्हेंबर - सेंग कुट स्नेमनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद. २४ नोव्हेंबर - गुरु नानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमेनिमित्त अनेक शहरांत सुट्टी. २७ नोव्हेंबर - कनकदास जयंतीनिमित्त बेंगळुरूमध्ये बँका बंद.

रविवार आणि शनिवारच्या सुट्ट्याही लक्षात घ्या नोव्हेंबर महिन्यात १,८,१५, २२ आणि २९ नोव्हेंबर रोजी रविवार असल्यामुळे बँकांच्या शाखा बंद राहतील. तसेच १४ नोव्हेंबर हा दुसरा शनिवार आणि २८ नोव्हेंबर हा चौथा शनिवार असल्यामुळे या दिवशीही नियमित बँकिंग सेवा बंद असतील. बँका बंद असल्या तरी ऑनलाइन सेवा सुरू बँकांच्या शाखांना सुट्टी असली, तरी UPI, ATM, मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग या डिजिटल सेवा नियमित सुरू असतील. मात्र, चेक क्लिअरन्ससाठी शाखेत जावे लागेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group