महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निकाल २०२६ कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत महाविकास आघाडी (मविआ) तीन जागांवर, तर महायुती दोन जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. या निकालामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, अंतिम निकाल काय लागणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. , आघाडीवरील उमेदवारांची स्थिती आणि अंतिम निकाल यामध्ये फरक असू शकतो. त्यामुळे अधिकृत निकाल जाहीर होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पाच मतदारसंघांतील लढतीचे चित्र काय?
महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक झाली. उपलब्ध प्राथमिक आकडेवारीनुसार, मतदारसंघनिहाय आघाडीचे चित्र पुढीलप्रमाणे आहे.शहर शोधा
नागपूरमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणी सुरू असताना एक अजब आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर अनेक मतदारांनी मतपत्रिकेवर केवळ ‘२’ हा आकडा लिहिल्याने मोठ्या प्रमाणात मते अवैध ठरली आहेत. या एकाच पॅटर्नमुळे सुमारे ४ ते ५ हजार मते रद्दबातल ठरल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत एकूण १ लाख ६५ हजार ५४१ मतदान झाले होते. यापैकी तब्बल १५ हजार १०६ मते अवैध ठरली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने मते अवैध होणे हे पदवीधर मतदारसंघासाठी असामान्य मानले जात आहे. विशेषतः सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर फक्त ‘२’ लिहिलेल्या मतपत्रिका मोठ्या संख्येने आढळल्यामुळे हे प्रमाण आणखी वाढले आहे. या अवैध मतांचा थेट परिणाम मतमोजणीच्या अंतिम निकालावर होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू असताना हा प्रकार आणखी चर्चेत आला आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातही चुरस
पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर सुरू आहे. पहिल्या पसंतीच्या मतांत मविआच्या हर्षदा देशमुख आघाडीवर आहेत. दुसऱ्या स्थानी भाजपच्या स्मिता जाधव आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतांत भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप आले असून रासप पुरस्कृत उमेदवार दत्ता सावंत तिसऱ्या स्थानावर आहेत. पुणे शिक्षक मतमोजणीत 1 हजार 675 मतं बाद ठरली. तर 51 हजार 511 मतं वैध ठरलीत. त्यामुळे जिंकून येणाऱ्या उमेदवाराला किमान 25 हजार 756 मतांचा कोटा निश्चित केला गेला आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी 2 लाख 26 हजार 224 मते वैध ठरली आहेत. विजयासाठी 1 लाख 13113 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघातील 18 तासांपासून मतमोजणी सुरू आहे. चौदाव्या फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक 3,493 हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे दुसऱ्या क्रमांकावर तर शिंदेंच्या शिवसेनेचे बंडोखर उमेदवार श्रीकांत देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौदाव्या फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8,229 मतं तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 4736 मतं आहेत तर शिवसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांना 4,715 मतं आहेत. दरम्यान 26 उमेदवारांपैकी 15 उमेदवार रिंगणाच्या बाहेर आहेत.
छत्रपती संभाजीनगर निवडणुक अपडेट
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादी शपचे प्रतापसिंह पाटील हे 10 हजार 934 मतांनी आघाडीवर आहेत. डॉ. प्रतापसिंह पाटील 54 हजार 095 मतांनी आघाडीवर आहे तर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सतीश चव्हाण 43 हजार 161 मतांनी दुसऱ्या स्थानी आहेत.