भाजपला जोरदार धक्का ! माजी खासदाचा मुलगी अन् शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाला रामराम
भाजपला जोरदार धक्का ! माजी खासदाचा मुलगी अन् शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाला रामराम
img
Nandini khandare More
देशभरातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरु असून आता भाजपमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ सुरू आहे. बरेलीच्या आंवला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी आपल्या मुलीसह (कीर्ती कश्यप) आणि शेकडो समर्थकांसोबत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात (सपा) प्रवेश केला आहे. पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांना सदस्याता दिली. तसेच बसपचे नेते आबिद अली यांनीही इतर समर्थकांसह 'सपा'चा हात धरला आहे.

धर्मेंद्र कश्यप यांनी पक्ष बदलण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही पक्ष बदलले आहेत. माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बसपामधून झाली. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात (एसपी) काम केले. पुढे ते भाजपमध्ये सामील झाले आणि दोनदा लोकसभेत निवडून आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सपा उमेदवार नीरज मौर्य यांच्याकडून पराभव झाला होता. पम ते आता पुन्हा एकदा सपामध्ये परतले आहेत.

२०१३ मध्ये भाजपमध्ये सामील झाल्यानंतर, त्यांनी २०१४ ची आमला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. २०१९ मध्ये ते सलग दुसऱ्यांदा खासदार झाले. २०२४ मध्ये सपाचे नीरज मौर्य यांनी त्यांचा १५,९६९ मतांनी पराभव केला. माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांच्यासोबत त्यांची मुलगी कीर्ती कश्यप यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. कीर्ती कश्यप या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत सपाकडून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

माजी आयएएस राम बहादूर पासी, मुझफ्फरनगर लोकसभा आणि मेरठचे माजी उमेदवार दारा सिंग प्रजापती, बदाऊन बिसाउलीचे माजी आमदार कुशाग्र सागर, दातागंज बदाऊनचे माजी आमदार सिनोद कुमार शाक्य यांनी बसपासोडून सपामध्ये प्रवेश केला. अखिलेश यादव यांनी या सर्वांचे स्वागत केले. ​​केसी शाक्य, देवेश कुमार, प्रयागराजचे माजी आमदार अजय कुमार, सीतापूर सेवता विधानसभेचे बसपाचे उमेदवार चंद्रप्रकाश मिश्रा, भाजप नेते आणि एफसीआयचे संचालक शाहजहांपूर प्रदीप पांडे, माजी ब्लॉक प्रमुख तिल्हार सौरभ सिंह गांधी, रमाकांत गौतम, गौतम गौतम, श्रीश बहादूर यांनीही सपामध्ये प्रवेश केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group