राजकीय वर्तुळात शोककळा! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन
राजकीय वर्तुळात शोककळा! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन
img
Nandini khandare More

राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. या निधनामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. 

भारतीय जनता पक्षाचे मुजफ्फरपूरचे माजी जिल्हाध्यक्ष आणि बिहार प्रदेशचे माजी उपाध्यक्ष रवींद्र प्रसाद सिंह यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने पक्षासह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. पक्षातील नेते, कार्यकर्ते यांनी दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भाजप नेते मनीष कुमार यांनी रवींद्र प्रसाद सिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहेत. सिंह यांचे निधन हे भाजप परिवारासह समाजासाठी मोठे नुकसान असल्याचे त्यांनी म्हटले. 

रवींद्र प्रसाद सिंह हे पक्षासाठी खूप महत्वाचे संघटक होते. संघटनात्मक कामांसोबतच ते सामाजिक कार्यांमध्येही सक्रिय सहभाग घेत असत. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. तसेच ते बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. त्यांच्या निधनाने आपल्याला वैयक्तिक स्तरावरही मोठा धक्का बसल्याचे मनीष कुमार यांनी सांगितले. मोहन भागवतांचा मोठा संदेश! स्वदेशी, सोशल मीडिया ते अमली पदार्थांवर काय म्हणाले? संघटनात्मक आणि सामाजिक कार्यांत महत्त्वाचे योगदान रवींद्र प्रसाद सिंह यांचे अकाली निधन अत्यंत दुःखद असल्याचे मनीष कुमार यांनी नमूद केले. 

त्यांच्या निधनामुळे पक्षाने एक अनुभवी संघटक गमावला आहे. पक्ष आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण दीर्घकाळ ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले. भाजप नेते मनीष कुमार यांनी दिवंगत रवींद्र प्रसाद सिंह यांच्या आत्म्याला शांती लाभावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. तसेच या कठीण प्रसंगी त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांना आणि कार्यकर्त्यांना दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना व्यक्त केली.
BJP |
इतर बातम्या
Join Whatsapp Group