...तर,  RSS अशा दहा भाजप उभा करू शकतो , आम्हीच सर्वस्वी, या अहंकारात भाजपनं राहू नये; शरद पोंक्षेंचा इशारा
...तर, RSS अशा दहा भाजप उभा करू शकतो , आम्हीच सर्वस्वी, या अहंकारात भाजपनं राहू नये; शरद पोंक्षेंचा इशारा
img
वैष्णवी सांगळे
भाजपचीही काँग्रेस व्हायला लागली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कट्टर हिंदुत्व बाळगणाऱ्या दहा भाजप उभ्या करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, आता आम्हीच आहोत, या अहंकारात भाजपने राहू नये, असा सूचक इशारा ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे.



राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित तीन दिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफतांना ‘भारत एक हिंदू राष्ट्र’ या विषयावर पोंक्षे बोलत होते. रेशीमबाग येथील महर्ष व्यास सभागृहात हा कार्यक्रम झाला.

शरद पोंक्षे काय म्हणाले? 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची आई आहे, मात्र भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर, अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं, "आज भारतामध्ये हिंदूंचे सण, उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जातायत. 'गवनि म्हणा आम्ही हिंदू आहोत', असं म्हणण्याची ताकद केवळ केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळेच आहे. याचं संपूर्ण श्रेय मोदींसोबत संघाला जातं. 

पुढे ते म्हणाले, शंभर वर्षात अनेक उपेक्षा सहन करूनही संघ आज ताठ उभा आहे. संघ ही भाजपची आई आहे. मात्र, भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं. पुन्हा दहा-पंधरा वर्ष वाट पाहावी लागली तरी चालेल. पण, कट्टर हिंदूच्या दहा भाजप उभ्या करण्याची ताकद संघात आहे...", असं शरद पोंक्षे म्हणालेत. "मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाही, ते जाळणाऱ्यांनी वाचली नाही, वाचली असती तर ते जाळूच शकले नसते...", असं यावेळी बोलताना शरद पोंक्षे म्हणाले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group