भाजपचा विजयी चौकार ! 'या' उमेदवाराची चर्चाच चर्चा,  राष्ट्रवादीतून भाजपात आले, अन एका दिवसांत नगरसेवक झाले
भाजपचा विजयी चौकार ! 'या' उमेदवाराची चर्चाच चर्चा, राष्ट्रवादीतून भाजपात आले, अन एका दिवसांत नगरसेवक झाले
img
वैष्णवी सांगळे
राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. कालपर्यंत जे उमेदवार म्हणून मिरवत होते त्यांना तिकिट मिळाले नाही तर कोणाला अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी केलेल्या पक्षप्रवेशावर तिकीट मिळाले. त्यामुळे काळ राज्यात ठिकठिकाणी भाजप असो किंवा इतर पक्ष नाराज कार्यकर्ते सगळीकडेच दिसून आले. मात्र राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच विजयी सुरुवात केली आहे. 

मतदानाच्या आधीच भाजपने विजयाचा चौकार ठोकला असून राज्यातील तीन महापालिकांमध्ये मिळून भाजपचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्या आहेत.  तर दुसरीकडे पनवेल महापालिका आणि विदर्भातील धुळे महापालिकेतही भाजपच्या प्रत्येकी एक-एक उमेदवार विजयी झाले आहेत. 

पनवेल महानगरपालिकेत नितीन पाटील यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक- १८ ( ब) मधून हि निवड झाली आहे.यात चर्चेत आलेलं नाव म्हणजे उज्वला भोसले. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजीत राजे भोसले यांनी काल तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यांच्या धर्मपत्नी उज्वला भोसले यांना भाजपाचे तिकीट मिळवले होते. 

मात्र, आज अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे, धुळे मनपातील 'त्या' पहिल्याच नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात भाजप प्रवेश केला अन् दुसऱ्याच दिवशी नगरसेवक बनल्याचा वेगळाच रेकॉर्ड त्यांच्या नावावर तयार झाला आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group