आज संपूर्ण राज्यात सकाळी साडे सात वाजल्यापासून महानगरपालिका निवडणूकीसाठी सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी मत देण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, एका ठिकणी मतदान केंद्रांवर साप आढळून आला. सोशल मीडियावर सापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मतदान केंद्रावर मतदारांआधी साप पोहोचल्याचे दिसत आहे. ही घटना चेंबूर परिसरातील मतदान केंद्रावर घडली आहे.
१४ जानेवारी २०२६ रोजी चेंबूर येथे रात्री १० वाजता प्रभाग क्रमांक १४७ रात्री १० वाजता लॉरेटो कॉन्व्हेन्ट शाळा, आर सी एफ कॉलनी येथील मतदान केंद्रात ४ फूट लांबीचा घोणस जातीचा विषारी साप आढळला. त्यामुळे मतदान केंद्रातील सर्वअधिकारी, तसेच बंदोबस्ताला असलेल्या सुरक्षा कर्मचारी, पोलिसांमधे एकच खळबळ माजली. हा साप चपळ आणि धोकादायक असल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ सुरक्षित अंतर राखले.
मतदानाची प्रक्रिया अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली असताना हा प्रकार घडल्याने स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि सर्पमित्र यांची धावपळ उडाली. तातडीने बोलावलेल्या प्रशिक्षित सर्प बचावकर्त्याने (सर्पमित्र) मोठ्या कौशल्याने सापाला पकडले. सापाला कोणतीही इजा न करता सुरक्षित पकडून वन विभागाच्या देखरेखीखाली त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.